श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी महाराज श्रीपाद वल्लभांचे तसेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्री दत्तात्रेयांचे स्वामी हे पूर्णावतार मानले जातात. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे उद्गार स्वतः स्वामींनी केलेला आहे याचाच अर्थ स्वामी कर्दळी वनामध्ये स्वामी प्रगट झाले व त्या नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्र या सारख्या अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले. महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांनी साधारण २२ वर्षे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले. येथे स्वामींनी अनेक दीन दुबळ्या भक्तांचा उध्दार केला. त्यामुळे त्यांना बरेच लोक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखतात. त्यांचा कार्यकाळ हा १ ९ व्या शतकातील असून असे मानले जाते की इ.स. १४५ ९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांची स्थापना केली व त्या नंतर ते तेथून श्रीशैल्य या ठिकाणी यात्रेसाठी गेले व तेथेच गुप्त झाले. ते ह्या कर्दळी वनात तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडण्याच्या उद्देशाने गेला असता लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. त्या योगे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज पुन्हा भक्त कल्याणार्थ प्रगट होणे हे कदाचित विधिलिखित होते त्यामुळे कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली ते म्हणजे स्वामी महाराज.
याच स्वामींच्या अनेक लीला या श्री स्वामी चरित्रामृत या ग्रंथात आहेत. आम्ही आपणास अँप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
१. श्री स्वामी चरित्र सारामृत (२१ अध्याय)
२.श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
३. श्री स्वामी समर्थ स्तवन
४. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
५. श्री स्वामी समर्थाष्टक
६. महाराजांची आरती
७. श्री स्वामी समर्थ मानस पूजा
८. श्री स्वामी समर्थ मालामंत्र स्तोत्र
९. स्वामी समर्थ जप (Source: Youtube)
Swami Samarth est largement considéré comme la quatrième (troisième forme physique) incarnation de Dattatreya, un moine indien, divinité mystique et hindoue. Il serait également une réincarnation de Narasimha Saraswati, un autre ancien maître spirituel de la secte Dattatreya.
Selon Swami Samarth lui-même, il était apparu à l'origine dans les forêts de Kardali près de Srisailam, une ville sainte hindoue de l'actuel Andhra Pradesh.
L'application contient
1. Shri Swami Charitra Saramrut (chapitre 21)
2. Shri Swami Samarth Tarak Mantra
3. Shri Swami Samartha Stavan
4. Shri Akalkot Swami Stotra (Psaume)
5. Shri Swami Samarthashtak
6. Aarti de Maharaj
7. Shri Swami Samarth Manas Puja
8. Shri Swami Samartha Malamantra Stotra (Psaume)
9. Shri Swami Samarth Chanting (Source: Youtube)